मराठी विभागाची स्थापना 1970 मध्ये झाली. मराठी विभागातर्फे सध्या UG व PG कोर्सेस चालविले जातात. विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने दरवर्षी प्रसिद्ध वक्त्यांची व्याख्याने आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मराठी विभागातर्फे निबंध स्पर्धा, काव्यलेखन व काव्यसादरीकरण ई. स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने एम.पी.एस.सी. मराठी व्याकरण विचार परीक्षेचे आयोजन केले जाते. विभागातर्फे गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी आर्थिक मदत केली जाते. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. विभागातील शिक्षक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा यात सहभाग घेऊन शोधनिबंध सादर करतात. अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी अध्यापनात ICT चा वापर केला जातो. अनुसूचित जाती व जमाती मधील तसेच गरजू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न विभागातर्फे केला जातो.
Mahatma Gandhi Shikshan Mandalache
Dadasaheb Dr. Suresh G. Patil College, Chopda
Dist– Jalgaon, Maharashtra – 425107, INDIA.
Phone : +91 (2586) 220140 / 222240
Fax : +91 (2586) 220984
E-Mail : [email protected] (official)